नवोपक्रम

एक पाऊल प्रगतीचे 

                                                                           प्रास्ताविक

आज सगळीकडे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे वारे वाहत आहे.
प्रत्येक मूल प्रगत झाले पाहिजे हे मा.सचिव साहेबांचे स्वप्न आहे
जे पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी आपल्यावर सोपवली आहे.
आज सर्वांना शिक्षकांकडून दर्जेदार गुणवत्ता पुर्ण शिक्षणाची अपेक्षा आहे 
आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा शिक्षक स्वतः मनातून हे काम स्विकारेल 
हे स्वप्न केवळ साहेबांचे नसून प्रत्येक त्या शिक्षकाचे आहे 
ज्याला मनातून आपल्या मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे 
आणि माझ्या ह्या नवोपक्रमातून हे स्वप्न साकार करण्यासाठी नक्कीच मदत होईल असा मला विश्वास आहे
त्यासाठी फक्त थोड्याश्या सकारात्मक दृष्टिकोनाची थोड्याश्या मेहनतीची गरज आहे
आणि हे जर असेल तर महाराष्ट्र प्रगत व्हायला वेळ लागणार नाही 
देशाचे  उज्ज्वल भविष्य घडविण्यात आपला खारीचा वाटा असल्याचे आत्मिक समाधान आपल्याला मिळेल
आणि हे मिळवून देण्याचे कार्य माझ्या एक पाऊल प्रगतीचे या नवोपक्रमामधून शक्य झाले आहे.

           

          विवरण


अनुक्रमणिका


प्रमाणपत्र


प्रमाणपत्र


परिचय

1
अनुक्रमणिका

2
नवोपक्रमाचे शीर्षक

3
प्रास्ताविक
1
4
नवोपक्रमाची माझी गरज
2
4.1
नवोपक्रम निवडीचे माझे कारण
2
4.2
क्षेत्र
2
4.3
नविनता
3
4.4
उपयुक्तता
4
4.5
महत्त्व
4
5
नवोपक्रम निवडीचे माझे उद्दिष्ट
5
6
 नवोपक्रमचे नियोजन
6
6.1
 तज्ञाचे मार्गदर्शन
6
6.2
कृतींचा क्रम
7
6.3
उपक्रमासाठी सादर करावयाचे पुरावे
8
6.4
उपक्रमाचे स्थळ कालावधी खर्च
9
7
 नवोपक्रमाची कार्यवाही
10
7.1
पूर्वस्थितीची निरिक्षणे
11
7.2
प्रत्यक्ष कार्यवाही
12
7.3
उपक्रम 1 ते 12
12-26
7.4
उपक्रमानंतर चे निरिक्षण व् नोंदी
27
7.5
 शिक्षिकेची भूमिका
28-30
7.6
अप्रगत मुलांचा संकलन तक्ता तोंडी
31
7.7
अप्रगत मुलांचा संकलन तक्ता लेखी
32
8
यशस्विता
33-34
8.1
निष्कर्ष
35
8.2
आलेख तोंडी-लेखी प्रगत मुले
36
8.3
आलेख तोंडी-लेखी अप्रगत मुले
37-38
9
समारोप
39
10
संदर्भ साहित्य
40
11
परिशिष्ट
40-49


नवोपक्रमाची माझी गरज

माझी शाळा प्रा.शा.बूटखेड़ा येथे इयत्ता 5 ते 7 विद्यार्थी संख्या 101 असून मी मराठी इंग्लिश विषय शिकवते शिवाय इतर अवांतर कामे ही भरपू आहेत त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन करने शक्य नसते पण वर्गात अशी काही मुले असतात की त्यांना वैयक्तिक मार्गदर्शनाची खूप आवश्यकता असते. माझ्या पुढे अश्या काही समस्या होत्या जसे :-

1)  पायाभूत चाचणी ची पूर्व तयारी करणे.

2)   वाचन लेखन कौशल्य विकसीत करणे.

3 इयत्ता 5 वीतील 10 मुलांना प्रगत करणे.

4)   लिंगभेद दूर करणे.

5)  जातिभेद दूर करणे.

6)  प्रगत मुलांच्या शुद्धलेखनाच्या चूका कमी करणे.

7)  वैयक्तिक मार्गदर्शन मिळवून देणे.

वरील समस्या सोडविण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे त्यामुळे माझे प्रश्न सोडविण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे.

क्षेत्र :

इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची चाचणी घेतली असता 30 पैकी 10 विद्यार्थी अप्रगत आढळले. त्यांच्या वाचन लेखन क्षमतेचा विकास होण्यासाठी मी वाचन लेखन हे क्षेत्र निवडले. तसेच सातवीच्या  मुलामुलींमध्ये लाजणे एकमेकांसोबत विचारांची देवाणघेवाण करणे जातिनिहाय गट ही एक समस्या मोठ्या प्रमाणात होती तो कमी करण्यासाठी ह्या उपक्रमाची खूप गरज होती ती बऱ्याच प्रमाणात कमी करण्याचे कार्य या नवोपक्रमातून झाले आहे.
    या नवोपक्रमात वाचन,लेखन कौशल्य विकसन सोबत मूल्यशिक्षणाकडे ही लक्ष दिले आहे.

नवीनता   :-

          माझा हा नवोपक्रम पूर्णपणे नवीन आहे.
 यामध्ये
1)  एकावेळी अनेक समस्यांचे निवारण करण्याचे कार्य सफल झाले आहे .
2) हा उपक्रम विद्यार्थी हसत खेळत कोणत्याही दडपणाखाली येता हसत खेळत           शिक्षिकेच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करतात .
3)  वेळेची बचत होऊन प्रगत मुलांचे मार्गदर्शन अप्रगत मुलांना मिळते.
4)  योग्य ठिकाणी वैयक्तिक लक्ष मिळाल्यामुळे अप्रगत मुलांची प्रगती योग्य दिशेने होते.
5)  विविध उपक्रम तसेच साधनाद्वारे प्रगत मुलांनी अप्रगत मुलांना वाचन लेखन शिकविले.
6)  मुले मुलांच्या मदतीने शिकतात तसेच शिक्षिकेची भूमिका मार्गदर्शकाची आहे .   

उपयुक्तता महत्त्व :-

माझ्या ह्या समस्या आज सर्व शिक्षकांपुढे आहे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र करणे ही जबाबदारी आपणावर आहे ती पूर्ण करण्यासाठी माझ्या ह्या नवोपक्रमामुळे बरीच मदत होते.माझा हा नवोपक्रम प्रत्येक शाळेतील अप्रगत विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षकाला उपयोगी आहे .
महत्त्व

1विद्यार्थ्याचा पाया पक्का होऊन वर्ग प्रगत करण्याच्या दृष्टीने माझ्या ह्या उपक्रमाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
2)  विद्यार्थ्याच्या मनातील न्यूनगंड दूर होऊन आपल्याला ही आता लिहता वाचता येते असा आत्मविश्वास मुलांमधे निर्माण होतो.
3)  समायोजन शीलता हे मूल्य वाढीस लागण्यास मदत होते.
4) प्रगत मुलांच्या श्रुतलेखन तसेच शुद्धलेखनाच्या चुका दूर करण्यास उपयोगी आहे.
5) लिंगभेद दूर होण्यास मदत होते.
6) जातिभेद दूर करण्यास उपयोगी आहे .
आपल्या शिक्षण क्षेत्रात हवे तसे यश मिळाल्यामुळे आपल्या हातून देशाची ज्ज्व पिढी घडविल्या गेल्याचे आत्मिक समाधान शिक्षकाला मिळते .

वोपक्रमाची माझी उद्दिष्टे 

  वाचन लेखन कौशल्य विकसित करणे.
2     अचूक श्रुतलेखन करणे.
3    न्यूनगंड दूर करून आत्मविश्वास निर्माण करणे.
4   वैयक्तिक मार्गदर्शन मिळवून देणे.
5   स्वयंअध्ययनाला प्रेरित करून वर्गातील खोडयाचे प्रमाण दूर करणे.
6   जातीभेद हे मूल्य दूर करून स्त्री पुरुष समानता हे मूल्य रुजविणे.


     
 6   नवोपक्रमाचे नियोजन

प्रा. शा.बुटखेडा येथील इयत्ता 5 वी तील 10 विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी त्यांना भाषेच्या वाचन लेखन या मूलभूत क्षमता आत्मसात होण्यासाठी तसेच लिंगभेद जातिभेद दूर करुन समानता हे मूल्य रुजविण्यासाठी हा नवोपक्रम हाती घेतला आहे .
त्याचे नियोजन पुढील प्रमाणे

6.1  संबंधित तज्ञाचे मार्गदर्शन :-

माझ्या या समस्या तसेच त्यावर निवारण कसे करता येईल यासंबंधीच्या या नवोपक्रमाबद्दल मुलांशी चर्चा केली. नवोपक्रमाच्या यशस्वितेसाठी मुलांच्या सहकार्याची कशी आवश्यकता आहे हे मुलांना पटवून दिले. मुलांनी मोठ्या उत्साहाने नवोपक्रमात सहभागी होण्यास होकार दर्शविला नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री के. के. डोईफोडे सर यांच्याशी चर्चा केली त्यांनी ही या नवोपक्रमाला होकार दिला त्यानंतर डायट च्या तज्ञ मार्गदर्शकांशी सविस्तर चर्चा केली त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवोपक्रमाला सुरुवात केली यावेळी डायटच्या प्राचार्या श्रीमती जडे मॅम, श्री येवते सर, श्री तायडे सर, श्री कुमावत सर, श्रीमती क्षीरसागर मॅम, श्री चित्राल सर  यांच्या मार्गदर्शनाखाली नवोपक्रमाला सुरुवात केली.तसेच केंद्रप्रमुख आदमाने सर यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले.




अनु क्र.
              कृतींचा क्रम
1
       पूर्वचाचणी
2
       अप्रगत मुलांचा शोध
3
       गट  बनविणे
4
       अभ्यासाचे नियोजन
5
       शब्द पट्ट्या ,वाक्यपट्ट्या बनविणे 
6
       जोडी बनविणे
7
       पी पी टी बनविणे
8
       शब्दांच्या भेंड्या
9
       शब्द निर्मिती
10
       कागदी पताका बनविणे
11
       वाक्य निर्मिती
12
       उत्तर चाचणी
13
       बक्षीस  वितरण
    

.3 नवोपक्रमासाठी सादर करावयाचे पुरावे :-

1 अप्रगत मुलांच्या सरावासाठी केलेल्या वह्या

2)    प्रगत मुलांच्या श्रुतलेखन तसेच शुद्धलेखन साठी केलेल्या वहया

3)   पूर्वचाचणी उत्तरपत्रिका

4)    उत्तरचाचणी उत्तरपत्रिका

5 शब्दपट्टया

6)  वाक्यपट्टया

7)    पी पी टी

8 वाचनकार्ड

9)    कागदी पताका



4 उपक्रमाचे स्थळ कालावधी खर्च :-
स्थळ सदरील नवोपक्रम हा जि उच्च प्रा. शा. बुटखेडा या शाळेत सन 2015 2016 या शैक्षणिक सत्रात माहे जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत इयत्ता पाचवी च्या 10 अप्रगत तर इयत्ता सातवीच्या 30 प्रगत विद्यार्थ्यांसाठी राबविला आहे.
                      

                                                                    कालावधी 

अनु क्र.
      कृती
    कालावधी
1
     पूर्वचाचणी
   02   दिवस
2
उपक्रम निश्चिती व साहित्य बनविणे 
  10  दिवस
3
    प्रत्यक्ष कार्यवाही
    02  महिने
4
   अंतिम चाचणी
    02  दिवस
5
   अहवाल लेखन
    10  दिवस
6
   अहवाल सादरीकरण
    02  दिवस


खर्च या उपक्रमासाठी येणारा खर्च हा सहज करता येण्यासारखा असून मला या नवोपक्रमासाठी केवळ 200 रुपये इतका खर्च आला आहे .
अशाप्रकारे वरील कालावधीत योग्य ते नियोजन करुन हा नवोपक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला आहे.

                   
7.1  पूर्व स्थितिची निरीक्षणे :-

प्रस्तूत नवोपक्रम हा पूर्वचाचणी उत्तरचाचणी च्या दरम्यान विविध कृतींच्या आधारे राबविण्यात आला आहे .
पुर्वचाचणी घेतल्या मुळे इयत्ता 5 वीची मुले भाषा वाचन लेखनात कोठे आहे याचा अंदाज आला. पूर्वचाचणी मध्ये स्वर रहित शब्द काना, मात्रा, वेलांटी ,उकराचे प्रत्येकी दोन शब्द घेतले 5 वाक्यांचा एक उतारा तोंडी सांगितला मुलांनी ते शब्द वाक्ये ऐकून लिहले 25 गुणांच्या ह्या चाचणीत :-
1) गोपाल, लक्ष्मी पूजा ला शून्य गुण मिळाले तर ऋतुजा, सत्यशिला, निकिता,विशाल, आदित्य, विशाल यांना प्रत्येकी दोन गुण मिळाले. किरण ला 3 गुण मिळाले लक्ष्मी,पूजा गोपाल ने काहीच लिहले नव्हते तर इतरांनी स्वरविरहीत शब्द लिहले होते .
2 ) 5 गुणांसाठी एक उतारा वाचन घेतले तेव्हा गोपाल, लक्ष्मी पूजा ला वाचन करता आले नाही त्यांना शून्य गुण मिळाले इतरांनी साधे वाक्ये वाचण्याचा प्रयत्न केला.
3) या मुलांमध्ये इतर मुलांपेक्षा खोड्या करण्याचे प्रमाण ही अधिक होते शिकवलेले समजत नसल्यामुळे त्यांचे  शिकण्याकडे लक्ष लागत नव्हते परिणामी ते खोड्या करत.
4) आपल्याला काही येत नाही आपले चुकले तर आपल्याला इतर मुले हसतील त्यामुळे हे विद्यार्थी अलीप्त राहत असे.वर्गातल्या कोणत्याही कार्यात सहभागी होत नसे लिहता वाचता येत नसल्यामुळे त्यांच्यात न्यूनगंड निर्माण झाला होता.
5) इयत्ता 7 वीतील मुले मूली एकमेकांशी बोलत नसे. मुलींचे गट वेगळे मुलांचे वेगळे त्यातही जातीनुसार गट होते सर्व काम आपापल्या जातीच्या गटात होत असे.
6) सातवीच्या विद्यार्थ्यांमध्ये काही जोडशब्द तसेच शुद्धलेखनाच्या चूका मोठ्याप्रमाणात होत्या .
7) आकारिक मूल्यमापणातील उपक्रम या साधन तंत्राची पूर्तता करणे साठी उपक्रम राबविणे हा शिक्षकांचा उद्देश होता .

  7.2 नवोपक्रमाची  प्रत्यक्ष कार्यवाही 

    प्रगत महाराष्ट्राची चर्चा ऐकल्यानंतर यावर्षी इयत्ता 5 वीत प्रवेश झालेली 30 मुले नेमकी कोठे आहे हे पाहण्यासाठी तसेच मुलांचे वाचन लेखन तपासण्यासाठी एक चाचणी घेण्याचे ठरले.त्याआधारे एक पूर्वचाचणी तयार करण्यात आली इयत्ता 5 वीच्या मुलांना देण्यात आली असता 30 पैकी 10 विद्यार्थ्यांना लेखन वाचन येत नसल्याचे निदर्शनास आले त्या मुलांना किमान वाचता लिहता यावे यासाठी पुढील अनेक छोट्या छोट्या उपक्रमातून त्यांना वाचन लेखन शिकवले.

उपक्रम 1  :- तीन अप्रगत मुलांना एक अप्रगत मूल दत्तक देणे
   यामध्ये सर्वप्रथम 5 ते 7 च्या मुलांना एकत्र बोलावून त्यांना वाचन लेखनाचे महत्त्व पटवून सांगितले अप्रगत मुलांना प्रगत करण्यासाठी त्यांच्या सहकार्याची कशी आवश्यकता आहे हे सांगितले इयत्ता 7 वीच्या मुलांनी मोठ्या उत्साहाने अप्रगत मुलांना प्रगत करण्याचा संकल्प केला.
उद्दिष्टे   :-
             1)    अप्रगत मुलांना वाचन, लेखन करता येणे.
            2)     अप्रगत मुलांना वैयक्तिक मार्गदर्शन मिळवून देणे .

कार्यवाही :-
    सर्वप्रथम चिठ्ठया पाडून इयत्ता सातवीच्या 30 मुलांचे तीन तीन याप्रमाणे 10 गट तयार केले नंतर 10 अप्रगत मुलांच्या नावाच्या चिठ्या टाकून प्रत्येक गटाला एक याप्रमाणे चिठ्या वाटल्या ज्या गटाला ज्या नावाची चिठ्ठी मिळाली तो मुलगा त्या गटाला दत्तक दिला.
त्यानंतर गटाला कार्टूनच्या पात्राची नावे दिली जसे छोटा भीम नोबिता मोगली चूटकी ही पात्र मुलांना खूप आवडतात त्यामुळे मुलांना खूप आनंद झाला नंतर मुलांना आपल्या दत्तक मुलाला काय शिकवायचे कसे शिकवायचे कोणी शिकवायचे याचे नियोजन केले यात गटातील एका मुलाने आठवड्यातील दोन दिवस सोम-मंगळ एकाने बुध-गुरु दुसऱ्याने तर शुक्र-शनि तिसऱ्याने दीर्घ सुटीतील 20 मिनिटे शिकवायचे अप्रगत  मुलांना वाचन लेखनात नेमक्या कोणत्या चूका होतात त्या कश्या दूर करायच्या याचे वेळीच मार्गदर्शन मिळू लागले  त्यानंतर शिक्षिकेने 15 मिनिटे कच्चे दुवे शोधून नेमके काय शिकवायचे याचे मार्गदर्शन करु लागल्या तसेच प्रगत मुलांना येणाऱ्या अडचणी लगेच सोडवून देवू लागल्या अश्याप्रकारे रोज चा उपक्रम सुरु  झाला गटातील मुलांना आठवड्यातील केवळ दोनच दिवस शिकवावे लागत असल्यामुळे त्यांना ही बोअर होत नसे तसेच अप्रगत विद्यार्थ्याला ही नविन नविन मुलांकडून शिकायला मिळाल्यामुळे नवीनता आली ते ही उत्साहाने शिकू लागले.
  गटामध्ये दत्तक मुलाला रोजचा गृहपाठ मिळू लागला तसेच तो तपासून चुकांची दुरुस्ती ही वेळेवर होऊ लागली. अप्रगत मुलाला आलेल्या अडचणी प्रगत मुलांकडून सोडवल्या जाऊ लागल्या अप्रगत मुलांना प्रगत मुलांचे वैयक्तिक मार्गदर्शन मिळू लागले तो वाचन लेखन करण्यासाठी प्रवृत्त झाला.

उपक्रम :-  स्वतंत्र वह्यामध्ये सराव

उद्दिष्टे :-
1  लेखन श्रवण कौशल्य विकसीत करणे.
2  अक्षर सुधारणे
3 श्रवण कौशल्य विकसित करणे.

कार्यवाही

   हा उपक्रम राबवित असताना प्रत्येक अप्रगत मुलांना एक स्वतंत्र वही करायला सांगितली.त्यामध्ये दीर्घ सुटीतील अभ्यास गृहपाठ वर्गातील अभ्यास याच्या नोंदी होऊ लागल्या. चुकांची दुरुस्ती ही वह्या मधे होऊ लागली.प्रगत मुले अप्रगत मुलांना शब्द ऐकून लिहायला सांगत अप्रगत मुले ती ऐकून लिहत तसेच ते शब्द लगेच तपासून देत एखादे अक्षर वळणदार नसेल तर ते त्यांच्या गिरवून घेत, चुकले असेल तर त्याची दुरुस्ती करुन देत यामुळे मुलांचे अक्षर सुधारण्यास तसेच योग्य शब्द लिहण्यास ऐकून लिहल्यामुळे श्रवण कौशल्य विकसनला मदत झाली .


 उपक्रम 3:- शब्दपट्टया वाक्यपट्टया द्वारे वाचन

उद्दिष्ट :-  वाचन कौशल्य विकसित करणे.
कार्यवाही :-
  शिक्षिकेने प्रगत मुलांच्या मदतीने काही शब्दपट्या वाक्यपट्या तयार केल्या त्याद्वारे मुलांचे वाचन घेतले. ज्या मुलांच्या शब्द वाचताना चूका होत होत्या त्यांना शब्दपट्या देऊन वाचनाचा सराव घेतला. तर काहींना वाक्यपट्या द्वारे वाचनाचा सराव घेतला. वेगवेगळ्या प्रकारे वाचन घेतल्या मुळे नवीनता येऊन मुलांचा वाचनाचा उत्साह वाढला दृढ़ीकरण होऊन वाचन कौशल्य विकासाला हातभार लागला.  

उपक्रम :- 4 पी.पी.टी.द्वारे सराव  
            
उद्दिष्ट :- वाचन कौशल्य विकसीत करणे.  
           
   कार्यवाही :-

यामध्ये शिक्षिकेने काही पी.पी.टी.तयार केल्या.

1) अक्षर पी.पी.टी. :- अक्षर पी.पी.टी मध्ये ‘क ते ज्ञ’ प्रत्येक व्यंजनासाठी साठी अक्षरे व चित्रे टाकली. यात ‘क’ साठी तीन ते चार शब्द व त्याला अनुसरून चित्रे टाकली. असे ‘ज्ञ’ पर्यंत प्रत्येक व्यंजनासाठी साठी अक्षरे व चित्रे टाकली.त्याचप्रमाणेप प्रत्येक व्यंजनाला आवाज दिले त्यामुळे मुलांना श्रवण करण्याची संधी मिळाली.तसेच मुलांना एका व्यंजनासाठी अनेक शब्द मिळाल्यामुळे त्यांचे दृढीकरण होऊन  व्यंजनाची ओळख झाली.याचा फायदा लक्ष्मी,गोपाल व पूजा यांना विशेषकरून झाला.
2) शब्द पी.पी.टी. :- यामध्ये सर्वप्रथम स्वरविरहीत शब्द त्यानंतर कान्याचे शब्द, वेलांटी, उकार याक्रमाने अनुस्वारापर्यंत शब्द तयार केले प्रत्येक शब्दाला आवाज दिले. त्यामुळे मुलांना ऐकून शब्द वाचता आली. 
3)  वाक्य पी.पी.टी. :- यामध्ये देखील साधे ते अनुस्वारापर्यंत चे वाक्य तयार केले.त्यामुळे मुलांचे दृढीकरण होऊन वाक्य वाचण्याचा सराव झाला हा सराव प्रगत विध्यार्थी संगणकाच्या तासाला तसेच सवडीनुसार घेऊ लागले.पी.पी.टी.मध्ये मुलांना आवडणारे कार्टून्स,बाहुल्या,फुले यांची चित्रे टाकल्यामुळे मुले वाचनाकडे आकर्षित झाली.



उपक्रम 5 :-  रेतीमाती मध्ये शब्द लिहणे :-

उद्दिष्टे :-  श्रवण लेखन कौशल्ये विकसीत करणे

कार्यवाही

  मुलांना रेतीमातीशी खेळायला खूप आवडते परिसरात वाचन लेखन घेत असताना बरीच मुले रेतीमातीशी खेळत असे त्यांची ही सवय बघून प्रगत मुलांच्या मदतीने रेतीमाती मध्ये लेखन सुरु केले. यात प्रगत मुलाने शब्द वाक्ये सांगायचे अप्रगत मुलाने ऐकून ते मातीत बोटाने लिहायचे मिटवायचे. यामुळे नवीनता येवून मुलांना आनंद मिळू लागला लेखनासोबत श्रुतलेखनाचा सराव झाला.


               
उपक्रम 6  
शब्दनिर्मिती

उद्दिष्ट :- लेखन कौशल्यासोबत शब्दसंग्रह वाढविणे .

कार्यवाही यामध्ये अप्रगत मुलांना कोणताही एक शब्द देवून त्यातील प्रत्येक अक्षरापासून नविन शब्द तयार करण्यास सांगितले. 
ज्याने जास्तीत जास्त शब्द तयार केले त्याचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.

  जसे  :- 1                      
                           कदम
  
              कप                दळण                     मगर
             करवत            दम                        मनगट
             कळस             दगड                      मरगळ
             कडक              दरवळ                   मलम
                                                              
                                 
      
 2            दिवस
    
         दिवा                वजन               समई
                   दिवाळी            वड                   सडक
                    दिन                 वरण                समय
     अश्या प्रकारे विद्यार्थी विविध वाक्ये बनवू लागली. हे शब्द तपासून देण्याचे कार्य प्रगत विद्यार्थ्यांमार्फत होऊ लागले. शब्द तपासताना काही अडचणी आल्यास किंवा एखादा शब्द समजल्यास शिक्षिका मार्गदर्शन करत असे त्यामुळे विद्यार्थ्यांची विचार क्षमता विकसित होऊन शब्दसंपत्ती वाढण्यास मदत झालीलेखन कौशल्याचा विकास झाला.

 

 उपक्रम 7  :-  वाक्यनिर्मिती

उद्दिष्ट :-  लेखन कौशल्याचा विकास

कार्यवाही

  यामध्ये अप्रगत विद्यार्थ्यांना एक शब्द देवून त्याआधारे विविध वाक्ये बनविण्याची प्रेरणा दिली. प्रगत विद्यार्थ्यांने एक शब्द द्यायचे त्या शब्दाला अनुसरून अप्रगत विद्यार्थ्याने  जमेल तेव्हढी वाक्ये बनविण्याचा प्रयत्न करायचा.
 जसे  :-      1 )  गरम
                    1)   हे पाणी गरम आहे.
                    2)   चहा गरम असतो .
                    3)  मी गरम पाण्याने अंघोळ करतो .                     
              2 ) शेतकरी                                                                                   
1)        शेतकरी शेतात राबतो.
2)       शेतकरी धान्य पिकवितो.
3)       शेतकरी पावसाची वाट बघतो.
  अश्या प्रकारची विविध वाक्ये बनविण्याचा प्रयत्न विद्यार्थी करू लागला त्याला विचार करण्याची चालना मिळून स्वनिर्मितीचा आनंद मिळाला .

उपक्रम 8 :-  शब्द भेंडयांचा खेळ

  उद्दिष्ट :- लेखन कौशल्य विकसन करुन शब्द संपत्ती वाढविणे 
  
 कार्यवाही

  या खेळामध्ये एक अक्षर देवून त्या अक्षरापासून एक व्यक्तींचे नाव, एक फूल, फळाचे नाव, एक प्राणीपक्ष्याचे नाव एक वस्तुचे नाव तयार करायला सांगितले त्याला अनूसरून दहा अक्षरांची स्पर्धा घेतली मुलांनी खालील  प्रमाणे तक्ता तयार करुन त्यात नावे लिहायची ज्याचे सर्वप्रथम होईल तो विजेता.  त्याचे सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करायचे.  
जसे  :-
अक्षर
व्यक्तीचे नाव
फुलाचे /फळाचे नाव
प्राणी /पक्षी नाव
वस्तूचे नाव
 प

पवन

पारिजातक

पोपट

पतंग
 ग

गणेश

गुलाब

गाढव

गज

  अश्याप्रकारे विद्यार्थ्याला विचार करण्याची चालना मिळून लेखन कौशल्य विकासाला मदत मिळाली.
            
उपक्रम 9:- बालमित्र, वाचनकार्ड ,इयत्ता पहिलीचे कृती पुस्तक याद्वारे वाचन लेखन

उद्दिष्ट:- वाचन लेखन कौशल्याचा विकास
  विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव व्हावा यासाठी बालमित्राचे पुस्तक वाचन कार्ड इयत्ता पहिलीचे पुस्तक यातून अप्रगत मुलांचे वाचन लेखन घेतले. प्रगत विद्यार्थ्याने या पुस्तकातून शब्द वाक्ये सांगितले अप्रगत मुलांनी ते ऐकून लिहले. तसेच वाचन कार्ड पुस्तकातून वाचन घेतले. यामुळे वाचनाचा सराव झाला ऐकून लिहल्यामुळे श्रुतलेखनासोबत श्रवण विकास होण्यास मदत झाली.प्रगत विद्यार्थ्यांकडून चूका वेळीच दुरूस्त होऊन अप्रगतांना वैयक्तिक मार्गदर्शन मिळाले.


उपक्रम 10 :- वर्गातील स्वयंअध्ययन

उद्दिष्ट :- 1  स्वयंअध्ययनाला प्रेरित करून वर्गातील खोड्यांचे प्रमाण    कमी करणे.
        2  न्यूनगंड दूर करून आत्मविश्वास वाढविणे.

कार्यवाही :-

 वर्गात शिकवत असलेले काही विषय अप्रगत मुलांना कळत नाही. अश्यावेळी ह्या मुलांचे लक्ष अध्यापनाकडे लागता इतरांच्या खोड्या काढण्याकडे जास्त असते.  ते इतरांच्या अध्ययनात देखील व्यत्यय आणत त्यामुळे अश्या मुलांना स्वयं अध्ययनास प्रव्रुत्त केले. त्यांना शिकवलेले कळत नसेल अश्या वेळी स्वतः चा अभ्यास करायचे असे सांगितले ते मुलांना ही पटले. त्यांनी स्वयं अध्ययनाला सुरुवात केली.त्यामुळे आपोआपच खोडयाचे प्रमाण कमी झाले मुले स्वयंअध्ययनाने शिकू लागली.



उपक्रम 11 :- कागदी पताका बनविणे.  

 उद्दिष्ट:- 1  वाचन  लेखन कौशल्य विकसीत होणे .
         2 जातिभेद दूर करून स्त्रीपुरुष समानता मूल्ये रुजविणे .
          3 शुद्धलेखनाच्या चुका कमी करणे.
कार्यवाही :-
 यामध्ये प्रगत अप्रगत मुलामुलींच्या मदतीने कागदी पताका तयार केल्या.त्यावर विविध शब्द लिहले. आपण बनवत असलेल्या पताका सर्व जण बघणार म्हणून त्या व्यवस्थित असाव्या यासाठी मुलांनी त्या लिहण्यासाठी शुद्धलेखनाच्या नियमाचा वापर करुन लिखाण केले. तसेच आपसात चर्चा करुन लिहल्यामुळे विचारांची देवाण घेवाण होऊन मुले मिळून मिसळून वागू लागली. तसेच पताका वरील शब्द मुले वर्गअध्यापनाच्या वेळी स्वयंअध्ययन करताना वाचत असे. त्यामुळे त्यांच्या वाचनाचा सराव झाला .


उपक्रम 12 :- प्रगतांचे शुद्धलेखन श्रुतलेखन

उद्दिष्ट :-  1  श्रुतलेखनाच्या,शुद्धलेखनाच्या चुका कमी करणे.
         वाचन लेखन कौशल्य विकसीत करणे.
         3 जातीभेद लिंगभेद दूर करणे.
कार्यवाही :-

अप्रगत मुलांना मार्गदर्शन करायचे म्हणजे आपले लेखन बिनचूक असावे असे प्रगत मुलांना वाटू लागले शिवाय पायाभूत चाचणीत ही ह्रस्व दीर्घ च्या चुकांवर लक्ष दिले होते. त्यामुळे शुद्ध लिहणे महत्त्वाचे होते म्हणून या चूका कमी करण्यासाठी प्रगत मुलांना ही शुद्ध लिहता यावे यासाठी एक पाऊल प्रगतीचे उचलले. तसेच इयत्ता सातवीचे विद्यार्थी हे किशोर अवस्थेतून जाणारी असतात त्यामुळे मुलेमुली आपसात विचारांची देवाणघेवाण करायला संकोचतात, एकमेकांशी बोलत नाही. मुलींचा गट वेगळा, मुलांचा गट वेगळा शिवाय त्यातही जातीनुसार गट होते हे दूर करण्यासाठी मी या उपक्रमातच एक उपक्रम प्रगत मुलांसाठी सुरु केला. जोडी पाडणे अप्रगत मुलांसाठी जो गट बनविला होता त्यातील एक मुलगा शिकवत असे त्यावेळी इतर दोन रिकामे असत असे हे 20 विद्यार्थ्यांच्या चिठ्ठया टाकून जोड्या पाडल्या यामध्ये समान अंक किंवा प्राणी पक्षी फुलांची नावे याद्वारे सारखे अंक किंवा सारखी फुलांची प्राण्यांची नावे असणाऱ्या मुलांच्या जोड्या तयार केल्या या जोडीत मुलगा-मुलगी, मुलगी-मुलगी किंवा मुलगा- मुलगा अश्या जोड्या तयार झाल्या शिवाय त्यात कोणत्याही जातीशी जोडी लागली त्यामुळे सुरुवातीला मुले संकोचली पण नंतर त्यांना सवय झाली.आपल्या जोडीदाराला रोज पाच शब्द त्यात तीन जोडशब्द एक वेलांटी एक उकार असे शब्द तर पाच वाकये सांगायचे. दुसऱ्याने ते ऐकून लिहायचे पहिल्याने ते तपासून गुण द्यायचे. चुकलेल्या शब्दाची दुरुस्ती करुन घ्यायची हिच कृती दुसऱ्याने पहिल्यासोबत करायची या जोडीत ज्याला जास्त गुण मिळाले तो त्या दिवशीचा विनर बनला. अश्या प्रकारे त्यांच्या शुद्धलेखनाचा सराव झाला आणि चुकांचे प्रमाण कमी झाले. तिसऱ्या दिवशी ही जोडी परत चिठ्ठया पाडून बदलली त्यामुळे नवीनता येऊन सगळ्यांना सर्वांसोबत अभ्यासाची संधी मिळाली लिंगभेद जातिभेद दूर होण्यास मदत मिळाली. मुले मूली आपसात निसंकोच बोलू लागली. या गटाचा उपयोग इतर कामे जसे परिपाठ, वर्गसफाई, परिसर स्वच्छता यासाठी करुन घेतला


                               
                                         उपक्रमानंतर ची निरीक्षणे :-

उपक्रमानंतर ची निरीक्षणे उत्तर चाचणी घेतल्यानंतर अप्रगत मुलांमध्ये पुढील प्रकारे फरक लक्षात आला .
1  लक्ष्मी गोपाल पूजा या तिघांना साधे व्यंजन वाचता येत नव्हते. ती मुले पूजा लक्ष्मी साधे वाक्य वाचू लागले गोपाल साधे शब्द वाचू लागला विशाल, आदित्य,विशाल, सत्यशीलाहे साध्या उताऱ्या चे वाचन करू लागले किरण, निकिता तर चांगल्या प्रकारे वाचन करू लागल्या.
2  लेखनात ही पूजा, लक्ष्मी शब्द लेखन करू लागल्या गोपाल स्वरविरहित शब्द लिहू लागला सत्यशिला, आदित्य, विशाल, निकिता, विशाल, किरण, ऋतुजा चांगल्या प्रकारे जोदशब्द विरहित शब्द लिहू लागले.
3  अभ्यासाची आवड निर्माण झाल्यामुळे मुले स्वयं अध्ययन करु लागली त्यामुळे वर्गातील खोड्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली.
4   अप्रगत मुलांना आता आपल्याला ही वाचता येते म्हणून आत्मविश्वास निर्माण झाला ती प्रत्येक कार्यात सहभागी होऊ लागली.
5   शुद्धलेखनाच्या जोडशब्दाच्या चूका कमी झाल्या तसेच वर्गातील जातीनिहाय गट दूर होऊन सर्व मुलेमुली मिळून मिसळून वर्गात प्रत्येक कामात सहभागी झाली.
6    पूर्व चाचणी लेखीचा निकाल 6 %वरून 58 %इतका वाढला.
7   तोंडीचा निकाल 14 % वरुन 60% पर्यन्त वाढला .
8  प्रगत मुलांच्या चुकांचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात कमी झाले त्यांचा निकाल 48% वरून 72.4 %इतका वाढला .
9  जातिभेद दूर होऊन स्त्रीपुरुष समानता हे मूल्य वाढ
                                                
                                            शिक्षेकेची भूमिका :

   यामध्ये शिक्षिकेची भूमिका मार्गदर्शक म्हणून खूप महत्त्वाची आहे.
1  अप्रगत मुलांची किती प्रगती झाली ते नेमके कोठे अडकतात हे शोधून त्यांना नेमके कसे शिकवायचे याचे नियोजन शिक्षिका रोज दीर्घ सुटीतील 15 मिनिटे करून देत. तसेच मुलांना जेव्हा गरज पडली तेव्हा त्यांना मदत करत असे. प्रत्येक मुलाचे नेमके कच्चे दुवे शोधले प्रगत मुलांना आपल्या गटात तेच शिकवायला सांगितले.
2  प्रगत मुलांना अप्रगत मुले दत्तक दिली, त्यांचे गट बनविले ,तिसऱ्या दिवशी प्रगत मुलांच्या जोड्या बनवून दिल्या.
3 दर आठ दिवसाला चाचणी घेऊन पुढील आठ दिवसाचे ढोबलमानाने नियोजन करून दिले मुलांमधे थोड़ी जरी प्रगती आढळली तर त्यांना छान ग्रेट सुपर मस्त भारीच अश्या प्रकारचे शाब्दिक तसेच विविध स्माइली देऊन प्रोत्साहन दिले. 
4  प्रगत मुलांचे ही विविधरित्या कौतुक केले त्यांना तुम्हीच माझी सेना आहात तुमच्या मदतीशिवाय हे शक्य नाही तुम्ही मनावर घेतले तर आपण आपल्या बांधवांना नक्कीच लिहायला वाचायला शिकवू असे प्रोत्साहन दिले.
 मुलांच्या मदतीने शब्दपट्टया, वाक्यपट्टया तसेच अक्षरांच्या कागदी पताका तयार केल्या .
5   तसेच प्रगत मुलांचा जोडीतील सराव व्यवस्थित सुरु आहे की नाही हे बघण्यासाठी त्यांच्या वह्या आठ दहा दिवस मिळून तपासल्या. त्यांच्या जोड्या तिसऱ्या दिवशी बदलल्या त्यामुळे नवीनता येऊन मुलांना सर्वासोबत काम करण्याची संधी मिळाली. तसेच यांना जास्तीत जास्त सोबत राहता यावे यासाठी त्यांचे आणखी वेगवेगळ्या कामासाठी गट तयार केले. जसे 1 परिपाठासाठी गट यात वर्गातून एक, दोन ,तीन, चार या क्रमाने एक नंबर च्या मुलांचा एक गट दोन नंबर च्याविशाल मुलांचा दूसरा गट असे चार गट तयार केले. त्यामुळे प्रत्येकाला एकत्र काम करण्याची संधी मिळाली. अश्या प्रकारे परिसर स्वच्छता, वर्ग सफाई यासाठी ही विविध प्रकारे गट केले त्यामुळे  मुले मिळून मिसळून काम करू लागली .
   या उपक्रमात कोणाला कोणत्याही प्रकारची शिक्षा झाली नाही की कोणाला रागावले नाही, मुलांवर जबरदस्ती केली नाही. मुलांनी स्वतः हा उपक्रम स्वीकारला आपल्या बांधवांना प्रगत करण्याचा संकल्प करून यशस्वी केला.  


                                                      यशस्विता :-       

   माझा हा उपक्रम अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाला मी जी उद्दिष्टे निश्चित केली होती त्यात मला भरपूर यश मिळाले ते पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल.
1) उत्तर चाचणीनुसार गोपाल, लक्ष्मी ,पूजा यांना 25 गुणांपैकी गोपाल ला 05 पूजा 18 तर लक्ष्मीला 10 गुण मिळाले तर निकिता, किरण, सत्यशिला ,ऋतुजा यांना अनुक्रमे 18, 22, 15, 17 गुण व् विशाल ,आदित्य, विशाल ला अनुक्रमे 12, 17, 11 गुण मिळाले यावरून त्याचे लेखन कौशल्य बऱ्यापैकी विकसित झाल्याचे दिसून आले.
2)  तोंडीच्या उत्तर चाचणीनुसार मुलांमध्ये पुढीलप्रमाणे विकास झाल्याचे दिसून येते. लक्ष्मी, पूजा, गोपाल यांना 5 पैकी 00 गुणांवरून प्रत्येकी 2 गुण मिळाले. ज्यांना अक्षर ओळख नव्हती त्यांनी साधे वाक्य वाचण्याचा प्रयत्न केला तर निकिता, किरण, ऋतुजा यांना अनुक्रमे 4 गुण मिळाले तर सत्यशीला ला 3 गुण मिळाले यावरून त्यांचे वाचन कौशल्य विकसीत झाल्याचे दिसून येते.
3)  वर्गात शिकवलेले फारसे कळत नसल्यामुळे अप्रगत मुलांचे लक्ष वर्गात खोड्या करण्याकडे जास्त होते. अश्या विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय लागल्यामुळे वर्गात जर समजणारा विषय सुरु असेल तर ती स्वतः च्या अभ्यासात रमू लागली यामुळे आपोआपच खोड्याचे प्रमाण कमी झाले.
4)  आपल्याला काही येत नाही मुले हसतील म्हणून अप्रगत मुले वर्गातील कोणत्याही कार्यात सहभागी होत नव्हती ती मुले आता आत्मविश्वासाने वर्गातील प्रत्येक कार्यात सहभागी होऊ लागली त्यांच्यातील न्यूनगंड दूर होण्यास या उपक्रमामुळे फार मोठी मदत झाली वर्गात कधीच बोलणारा गोपाल आता उत्तरे चुकत असली तरी देण्याचा प्रयत्न करू लागला.
5) सातवीची मुले मूली जी आपसात बोलत नव्हती ती आता बिनधास्तपणे एकमेकांशी गप्पा करू लागली एकमेकांच्या मदतीने आपल्या अडचणी सोडवू लागली परिपाठ परिसर स्वच्छता इत्यादी साठी मुलेमुली एकत्र असे गट तयार झाले त्यामुळे वेगवेगळ्या जातीचे मुलेमुली एकत्र काम करू लागली जातिभेद लिंगभेद दूर होण्यास मदत झाली.
6) इयत्ता सातवीतील प्रगत मुलांच्या जोडशब्द तसेच शुद्धलेखनाच्या चूका मोठ्या प्रमाणात होत्या. त्याही आता जोडीमध्ये 5 शब्द 5 वाक्य यांचे श्रुतलेखन  घेतल्यामुळे कमी झाल्या अप्रगत मुलांसोबत प्रगत मुलांसाठी ही प्रगतीचे एक पाऊल उचलले .
7)  इयत्ता सातवीच्या मुलांना दत्तक दिल्यामुळे त्यांच्या आकारिक मूल्यमापनातील उपक्रम या साधन तंत्राची पूर्तता झाली.
माझ्या या नवोपक्रमाचे यश दररोज प्रगत अप्रगत मुलांच्या चेहऱ्यावर झळकत होते. थोड़ीशीही प्रगती झाली की त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसत होती. थोडेसे लिहता वाचता आले की त्यांचा चेहरा आनंदाने फुलून जायचा आणि हेच या उपक्रमाचे सर्वात मोठे 


                                  8.1 निष्कर्ष  :-


1 ) वाचन कौशल्य 14 % वरुन 60% पर्यन्त वाढले.

2 )  लेखन कौशल्य 6% वरुन 58 % पर्यन्त विकसीत झाले.

3)  प्रगत मुलांच्या शुधलेखनातील प्रगतीची वाढ48 %वरुन 72.4% वाढली .

4 )  अप्रगत मुलांच्या मनातील न्यूनगंडाची जागा आत्मविश्वासाने घेतली.

5)  अप्रगत मुलांच्या खोड्याचे प्रमाण कमी होऊन ती स्वयं अध्ययनात रमू लागली.

6) जातिभेद लिंगभेद दूर होऊन सर्व मुले मूली एकत्र सर्व कार्यात सहभागी होऊ लागली .

बक्षीस वितरण 

उत्तर चाचणी नंतर ज्या गटातील अप्रगत मुलांच्या टक्केवारीत जास्त वाढ झाली असे तीन क्रमांक काढून त्यांना बक्षीस दिले इतर मुलांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनदंन केले. शिवाय वाचन प्रेरणा दिनी शालेय व्यवस्थापन समिती पालकांपुढे अप्रगत मुलांचे वाच घेतले. या मुलांचेही स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले पालकांनी ही समाधान व्यक्त केले.
समारोप:- इयत्ता पाचवीच्या मुलांना प्रगत करणे इयत्ता सातवी च्या मुलांच्या शुद्धलेखनाच्या चूका कमी करुन त्यांच्यातील लिंगभेद जातिभेद दूर करण्याच्या दृष्टीने माझा हा उपक्रम खूप फायदेशीर ठरला. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड दूर होऊन त्या जागी आत्मविश्वास आला. शिक्षक व् विद्यार्थी यांच्यातील दुरावा कमी होऊन त्यांचे नाते आणखी मजबूत झाले. हा उपक्रम प्रत्येक शिक्षकाला आपला वर्ग प्रगत करण्याच्या दृष्टीने अतिशय उपयोगी आहे .
अश्या प्रकारे या नवोपक्रमाद्वारे प्रगत अप्रगत मुलांसाठी एक पाऊल प्रगतीचे उचलले गेले.


                           एकच आस ,एकच ध्यास

                            धरु गुणवत्तेची का

          करू महाराष्ट्राचा शैक्षणिक विकास “




No comments:

Post a Comment