कार्यानुभव





                                  या सत्रातील शाळेचा शेवटचा दिवस,तसे हे सत्र थोडे धावपळीचे,टेन्शन चे गेले म्हणा, मुलांना हवा तसा वेळ देता आला नाही.5 ते 7 वर्गच्या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करता करता नाकी नऊ आले.
  बदल्याचे टेन्शन बाजूला ठेवून मुलांसोबत आजचा दिवस पूर्ण मजेत घालवायचा ठरवला.
सकाळी साडे सात पासून शाळा होती.
सर्वांनी वर्गापुढे रांगोळी काढली चौथी च्या मुलींची रांगोळी त्यांच्या मानाने खूपच सुंदर होती.
मुलांनी सुरूवातीला पोस्ट कार्डवर आपल्या मित्र मैत्रीण,नातेवाईकाला
शुभेच्छा देणारे पत्र लिहिले.त्यावर मस्त पैकी चित्र काढली.
त्यानंतर सर्वांनी गटात आकाश कंदील बनवले सर्व जण आपला आकाश कंदील कश्याप्रकारे सुंदर करता येईल हे बघत होता. सर्व तल्लीन होऊन काम करत होते.आकाश कंदील तयार झाल्यावर सर्वजण विचारत होते कोणाच्या गटाचा आकाशकंदील छान झाला.मला हे ठरवणे खूप कठीण होते.कारण सर्वच आकाशकंदील इतके सुंदर झाले होते न निवडच करता येत नव्हती. मी हा निर्णय मुलांवर सोडला. पहिला व दुसरा नंबर मुलांनी एकमताने निवडला, उरलेल्या सगळ्यांचा तिसरा नंबर मी दिला .
  त्यानंतर मुलांसोबत *दंगल*हा चित्रपट बघितला. मी याआधी ही हा चित्रपट दोन वेळेस बघितला होता पण खरं सांगू तर मूलांसोबत जितकी मजा आली ती याआधी कधीच आली नाही.सकाळी साडे सात ते चार वेळ कसा गेला समजलेच नाही खूप मजा आली 

No comments:

Post a Comment