अप्रगतांसाठी उपक्रम







केस स्टडी*
*प्रगतीच्या दिशेने एक पाऊल*
   *समस्या* :- उलटे लिहिणाऱ्या गोपालला लेखन वाचन शिकविणे
विद्यार्थ्यांचे नाव : गोपाल एकनाथ पवार
*मार्गदर्शक शिक्षिका*:- श्रीमती बरंडवाल सविता धनाजी
*शाळेचे नाव* : प्रा.शा. बुटखेडा ता.जाफराबाद जि. जालना
माझ्याकडे 5 ते 7 वर्गाचा गणित व विज्ञान हा विषय आहे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात सर्व मुलं प्रगत होणे अपेक्षित आहे .अश्यावेळी माझ्याकडे इयत्ता पाचवीत 10 मुलं अशी आली की त्यांना लेखन वाचन किव्हा अंक ओळख ही नव्हती.शिवाय गोपाल तर अगदी कावराबावरा,घाबरट व उलटे लिहणारा असा विध्यार्थी होता. 5 ते सात जवळपास 100 विध्यार्थी होते व शिकवणाऱ्या आम्ही दोघीच होतो. अश्यावेळी उलटे लिहिणाऱ्या गोपालला प्रगत करणे एक दिव्यच होते.
समस्या :- 1 )गोपालला लिहिता वाचता न येणे
2 ) अंकओळख नसणे
3 ) *गोपाल चे उलटे लिहणे*


4) गोपाल मध्ये आत्मविश्वास नसणे
5 )  *गोपालचे सांगितलेले लगेच विसरून जाणे*
6 ) गोपालला वैयक्तिक मार्गदर्शन मिळवून देणे.
7 ) गोपाल मधील न्यूनगंड दूर करणे.
*उपाय योजना*
1) गोपाल शिकू शकतो हा आत्मविश्वास स्वतःमध्ये व गोपाल मध्ये निर्माण केला.
2) वर्गाची,शाळेची त्याची भीती दूर केली
3 )
वर्गातील छोट्या छोट्या कामात गोपाल चा सहभाग घेतला ,जसे बिस्कीट वाटप, हजेरी घेणे ऑफिस मधून काही वस्तू मागविणे त्यामुळे त्याची भीती दूर झाली आणि हळूहळू तो अभ्यासाला लागला.
4 ) त्याने अगदी एखादे अक्षर ,अंक बरोबर लिहले तर त्याला प्रोत्साहन दिले.
5 )  गोपालला शिकवण्याची आवड असलेल्या मुलांना गोपालला दत्तक दिले.
6 ) मुलांनी वाक्यनिर्मिती,शब्दनिर्मिती,शब्दपट्ट्या, ppt, रेतीमाती लेखन,व वेळेवर सुचेल त्या अनेक उपक्रमातून गोपालला लिहणे वाचणे शिकवण्यासाठी मोलाची मदत केली.
*निष्कर्ष*
1) आज गोपाल सर्व मुलांमध्ये आत्मविश्वासाने बिनधास्त वागतो,
  2 ) वाचन लेखन करतो.
3 ) गणिती क्रिया करतो
*उलटे लिहिणारा माझा गोपाल आज सातवीत 40 /45 % निश्चितच घेतो*


ओम


फिलिंग परत एकदा लय भारी रविना सोबत ओम ने ही घेतली भरारी.*

      ओम हा इयत्ता पाचवीत शिकणारा विध्यार्थी,चौथीनंतर दुसऱ्या शाळेत टाकायचे म्हणून पालक बरेच वेळेस TC घ्यायला आले.कारण या शाळेत मुलं चौथीपर्यंत चं राहतात.पाचवीनंतर गावातल्या हायस्कूलमध्ये किव्हा तालुक्याच्या शाळेत जातात. ओम च्या पालकाला समजावले की इथेच राहू द्या पण ते tc साठी अधूनमधून चक्कर मारायचेच त्या दरम्यान त्यांना शाळेत झालेला थोडाफार बदल जाणवला आणि त्यांनी ओमला आमच्या शाळेत राहू देण्याचा निर्णय घेतला.

   ओम ची सुरुवात ही अगदी * * *1,2,3* पासूनच झाली.ओमला हळूहळू अक्षरे ओळखता येऊ लागली, त्यामुळे ओमला अभ्यासाची आवड निर्माण झाली. तो ही पटापट अभ्यास करू
नवीन अभ्यास घेण्यासाठी तयार राहू लागला.

    आज एव्हढा अभ्यास द्या मी करून आणतो.मला सुचवू लागला.एखादे वेळी मला वहिवर लिहून देण्याचा कंटाळा आला मी कमी अभ्यास देऊन थोडा टाळण्याचा प्रयत्न केला तरी ओम काही भरपूर  अभ्यास लिहून घेतल्याशिवाय माझा पिच्छा सोडत नाही.

   अगदी * * *1,2,* पासून सुरुवात केलेल्या ओमचे या दोन महिन्यात साधे वाक्य वाचन (जोडशब्द विरहितसुरू आहे.100 पर्यंत उजळणी कोणताही अंक विचारा तो सांगतो.हातच्या बेरीज आणि उसण्याची वजाबाकी करतोय.5 पर्यंत पाढे पाठ झालीत.आणि तीन अंकीला एक अंकी संख्येने गुणने हा गुणाकार करतोय.  ABCD चे सर्वअक्षर ओळखतो.इतकेच नाही तर कालपासून आता इंग्रजी शब्द पाठ करायला द्या हा आग्रह सुरू आहे स्वारीचा आणि तीन शब्द पाठ ही केले.1 ते 50 रोमन अंक ओळखतो.


      


No comments:

Post a Comment