परिपाठ

                     माझ्या शाळेचा परिपाठ 
         शाळेत पाऊल ठेवले की मन प्रसन्न होते कारण परिसरात असलेली हिरवीगार झाड़ी या झाडांच्या मुलांच्या सहवासात दिवस कसा जातो कळत नाही.
 मुले गटाने वर्गसफाई व् परिसर सफाई करतात या साठी नियोजन करुन दिलेले असतात त्यामुळे सर्वांच्या वाट्याला सारखे काम येते.
  नंतर परिपाठाला सुरुवात होते दोन दिवस मराठी, दोन दिवस हिंदी आणि दोन दिवस इंग्रजीतून परिपाठ होतो.
 यासाठी प्रत्येक वर्गातील मुलांचे विविध पद्धतीने गट केले जातात, गटात वर्गातील प्रत्येक मुलाचा सहभाग असतो. ज्या गटाचा परिपाठ असेल त्या गटाने  प्रत्येक मुद्द्याच्या चिठ्ठया करायच्या आणि ज्याच्या वाट्याला जी चिठ्ठी येईल त्याने तो मुद्दा घ्यायचा व् त्याची तयारी करायची, परिपाठाची तयारी किमान तिनचार दिवस आधी चालते. कारण त्याच गटाचा नंबर जवळपास एका महिन्यानी येतो म्हणून तयारी करायला भरपूर वेळ असतो .
    परिपाठात पुढील मुद्दे असतात
 *1) राष्ट्रगीत 2) प्रतिज्ञा 3) संविधान 4) प्रार्थना 5 समूहगीत 6) दिनविशेष 7) GK प्रश्न 8) पाच इंग्रजी शब्द 9) इंग्रजी/मराठी विरुद्धार्थी शब्द 10) पाच इंग्रजी वाक्य 11) तारीख तो पाढा 12) कविता गायन 13) परिपाठावर प्रतिक्रिया*

  सरासरी चाळीस मिनिट परिपाठ चालतो परिपाठात सर्व मुलांना सहभागी होता येते
  परिपाठात विचारली जाणारी प्रश्न, शब्द, वाक्य *एक दिवस आधी फळयावर ज्यांचा परिपाठ असेल ती मुले लिहून देतात* तो फळा (दुपारसत्रात)10 मिनिटाच्या सुटित बाहेर ठेवतात इतर मुले ती लिहून घेतात व् दुसऱ्या दिवशी तयारी करुन येतात.
   महीना अखेर परिपाठावर आधारित 100 गुणांची चाचणी होते ज्यांना चांगले गुण मिळाले त्यांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत केले जाते


 


No comments:

Post a Comment