इयत्ता सातवीत विज्ञानाच्या पाठात पान, फूल, मूळ यांच्या विषयी माहिती दिली.त्यासाठी मुलांना परिसरातील काही पाने,फुले,आगाऊ उगलेली झाडे,गवत आणायला सांगितले
मुलांनी
*पानांचे*विविध प्रकार जसे दंतेरी पान, खंडीत पान, साधे पान, सलग पान,संमुख पान, एकांतरीत पान,जाळीदार शिरविन्यास, समांतर शिरविन्यास, पानांचे विविध भाग
*फुलांचे* विविध भाग निदलपुंज,दलपुंज, परागकोष, कुक्षी,कुक्षीवृंत, वृंत,देठ,अंडाशय
*मुळांचे* सोटमूळ,तंतुमय मूळ
प्रत्यक्ष समजावून घेतले
इयत्ता पाचवीच्या वर्गात मापनावरील उदाहरणे हा पाठ शिकवताना काही प्रात्यक्षिक घेतले. त्यासाठी घरी पडलेला एक साडे सात मीटर लांबी चा टेप होता,तो शाळेत घेऊन गेले.मुलांनी प्रत्यक्ष विविध वस्तूंची मापे घेतली.खिडकीची लांबी रुंदी, दाराची,टेबल,फळा, कॉम्पुटर,वही व्हरांड्यातील खांब यांची लांबी रुंदी मोजली.व्हरांड्याची लांबी मोजली.त्यावर आधारित बेरीज वजाबाकी ची उदाहरणे सोडवली.
इयत्ता पाचवीच्या वर्गात मापनावरील उदाहरणे हा पाठ शिकवताना काही प्रात्यक्षिक घेतले. त्यासाठी घरी पडलेला एक साडे सात मीटर लांबी चा टेप होता,तो शाळेत घेऊन गेले.मुलांनी प्रत्यक्ष विविध वस्तूंची मापे घेतली.खिडकीची लांबी रुंदी, दाराची,टेबल,फळा, कॉम्पुटर,वही व्हरांड्यातील खांब यांची लांबी रुंदी मोजली.व्हरांड्याची लांबी मोजली.त्यावर आधारित बेरीज वजाबाकी ची उदाहरणे सोडवली.समविषम संख्या ओळखा
मुलांच्या अंगात भूमिती संचारली*😃
परिमिती हा घटक शिकवत असताना पेन पेन्सिल चा वापर न करता आयात ,चौरस काढा व त्याच्या बाजू मोजा हा उपक्रम वर्गात घेतला सुरुवातीला कसे बनवायचे म्हणून गोंधळी आधी वहीच्या पानाचा शोध लागला त्यापासून आयत, चौरस बनले त्याच्या बाजूंची बेरीज ही झाली परिमिती ही समजली आणि हळूहळू मुलांच्या अंगात भूमिती शिरली.....वर्गात जे दिसेल ते त्यापासून आयत चौरस बनले.ज्यांना काहीच नाही सापडले ते तर स्वतःच अक्षरशः जमिनीवर पसरले आणि आकृत्या तयार झाल्या.परिमिती ही मोजली.
पण मग आता आम्ही इथे थांबलो नाही तर सहावी,सातवीच्या मुलांनी त्यांच्या आकृत्या,त्रिकोण चौरासाचे प्रकार बनवले.पाचवी सहावीच्या मुलांनी रेषा, किरण,रेषाखंड,काटकोन ,विशालकोन,लघुकोन,सरळकोन,पूर्णकोन,प्रविशालकोन *समभूजकोन,समद्विभूजकोन, विषमभूजकोन* आणि ज्याला जे सुचेल ते काढू लागले.जणू काही मुलांच्या अंगात भूमिती संचारली होती.खूप मज्जा आली.






































No comments:
Post a Comment