उपक्रम

 काही गणिती क्रिया घेण्यासाठी मला स्ट्रॉ पासून समोसे बनवायचे मनात होते पण वेळ मिळत नव्हता त्यामुळे एक उपाय शोधला  कला कार्यानुभव तासिके अंतर्गत मुलांना समोसे कसे बनवायचे शिकवले आठ दहा मुलांनी पटकन शिकून घेतले आणि दीर्घ सुटित त्यांनी इतर मुलांना शिकवले व् त्यांच्या कडून  बनवून घेतले एका तासात जवळपास 200 समोसे तयार झाले आता तीनचार दिवसात मला हवे तितके समोसे तयार होतील शिवाय मुलांना नवीन काही तरी शिकता आले याचा आनंद ही मिळाला
  ह्या समोस्यांचा वापर दाराला तोरण, झुंबर मध्ये करतात


 आज माझ्या मुलाला सुचलेली एक भन्नाट आईडिया
विशाल सुटीत माझ्याकडे आला व् मला म्हटला मॅडम मला तुम्हाला काही तरी दाखवायचे आहे मी म्हटले काय रे तर त्याला सुचलेली ती आईडिया बघून मी तर अवाक् झाले जो लेखन वाचन इतर गोष्टीत अगदी साधारण आहे त्याला कोणतीही गोष्ट एकदा समजावून संगीतलेली कधीच कळत नाही त्याने माझ्यापुढे संख्या शिकण्याचे एक असे साधन ठेवले की त्याचा खर्च अगदी शुन्य सहज हाताळू शकतो असे तो म्हणाला मॅडम तुम्ही संख्या शिकविण्यासाठी वेगवेगळे खेळ घेता त्यातून मला एक आईडिया आली व् मी हे बनवले

त्यात त्याने थोड्या जाड्सर कागदाच्या काही लांब पट्टया तयार केल्या त्याच्या टोकावर एक वेगळ्या आकाराची कागदाची पट्टी बसवली त्यावर संख्या लिहल्या त्या पट्टया एका नट असलेल्या खिळ्यात बसवल्या ज्यामुळे त्या इकडे तिकडे फिरवता येत होत्या यात जितक्या पट्टया टाकल्या तितक्या अंकी तयार करता येते पट्टया सरकवून संख्या बदलता येते इतर मुलांनाही ते खूप आवडले उदया आम्हीही करुन आणतो असे त्यांनी सांगितले







*संख्या ओळख,कॅरम आणि समोसे*

काही दिवसांपासून संख्या ओळख साठी मुलांचा एक खेळ घेत आहे मुलांना गुलाबी समोसा हा एककाचे प्रतिक, पिवळा समोसा दशकाचे प्रतिक,हिरवा समोसा शतकाचे प्रतिक अशी ओळख झाली आहे यात जितक्या रंगाचे समोसे असतील तितक्या अंकी तयार करता येते येथे तिन अंकी संख्येची ओळख करण्यासाठी तीन रंगाचे काही समोसे घेतले आहे यात
   कॅरम च्या आकाराचा चौकोन आखला त्यात हे समोसे टाकले आणि एक प्लास्टिक च्या चापट आकाराच्या गोटीचा वापर केला या गोटीला रेषेवर ठेवून समोसे चौकोनाच्या बाहेर काढायचे असा खेळ घेतला एका वेळी चार किव्हा दोन,तीन जण ही हा खेळ खेळू शकतात चौकोनातले  समोसे संपले की प्रत्येकाने आपण जिंकलेल्या समोश्याची किम्मत काढायची ज्या रंगाचा समोसा आपण जिंकला नाही त्याच्याजागी शून्य द्यायचे यातून मुलांची संख्या ओळख छान होते शिवाय शून्य कधी द्यायचा व् का द्यायचा हे स्पस्ट होते
  मधल्या  सुटित,ऑफ प्रेड असेल तेव्हा मुले हा खेळ खूप मजेने खेळतात 
 


 आज रोजी 'पायाभूत चाचणी निकाल विश्लेषण' या सर्वेच्या निमित्ताने जि..उच्च प्राथ.शाळा बुटखेडा जि..उच्च प्राथ.शाळा सावरगाव म्हस्के येथे डॉ.विशालजी तायडे जेष्ठअधिव्याख्याता डायट जालना यांनी भेट दिली.
    बुटखेडा येथील विद्यार्थ्यांच्या अंगी व्यवस्थितपणा स्वयंशिस्त हे गुण शिक्षकांनी रूजविले आहे.शिवाय येथे शिक्षकच नव्हे तर विद्यार्थीही 'ज्ञानरचनावादी' शैक्षणिक साहित्य निर्माण करतात हे पाहून डॉ.विशालजी तायडे यांनी उपक्रमशील शिक्षिका श्रीमती बरंडवाल यांचा विद्यार्थी विशाल बदर .6 वी यास प्रेरणारुपी 101 रुपयाचे बक्षीसही दिले. विद्यार्थ्यांच्या वर्गातील ज्ञानरचनावादी खेळात तायडे सर सहभागी झाले.
   
  






 आज आमची बिन दप्तराची भरली,

  निसर्गातून शिकायला मिळावे यासाठी मुलांना शाळेच्या परिसरातून पाने तोडून आणायला सांगितली कोणाचेही पान सारखे नसावे हे ही सांगितले मुलांनी 10 मिनिटातच जवळजवळ विविध प्रकारच्या 70  झाडांची पाने तोडून आणली
   या पानांतून मुले पानाचा विविध आकार, शिरांची मांडणी, संयुक्त पान, साधे पान,पानांचा पृष्ठभाग खडबडीत-गुळगुळीत, हिरव्या रंगाच्या छटा, शिकले
 त्याचप्रमाणे मुलांनी तोडून आणलेल्या पानाच्या 
  झाडाचे नाव काय ?
   खोड कसे आहे ? (मजबूत, टणक,पोकळ )
  फुले येतात का ?
 फुलांचा रंग कोणता ?
  बिया येतात का ?
 पुनरुत्पादन कसे होते ? (खोडाद्वारे, पानाद्वारे,बियाद्वारे)
झुडूप ,रोपटे, वृक्ष यातील फरक काय? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे मुलांनी दिली
  काही झाडांची नावे मला माहित नव्हती ती मुलांनी मला सांगितली 
 आणि ज्या झाडांची नावे मुलांना व् मला ही माहित नव्हती त्या झाडांची पाने मुलांसोबत दिली गृहपाठ म्हणून आता ती बरोबर शोधून आणतील आईवडिल, बहिनभाऊ, आजी आजोबा कडून त्याची नावे 







                                                           कार्यानुभवातून शिक्षण
 




योगासने





                                                          शालेय पोषण आहार बैठक
                                                                                                                   



No comments:

Post a Comment